आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीसीने नियम मोडणाऱ्या खेळाडूंच्या निलंबनाची शिफारस केली , आता क्रिकेटमध्ये पंच दाखवतील रेड कार्ड !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : फुटबॉल आणि हॉकीच्या आधारावर आता क्रिकेटमध्येसुद्धा रेड कार्ड दिसण्याची शक्यता आहे. एखाद्या खेळाडूने मैदानावर नियम मोडले तर पंच त्याला निलंबित करू शकतील. मेरिलबोर्न क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) वर्ल्ड क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये रेड कार्डचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय बॅटचा आकारसुद्धा निश्चित करण्याची सूचना केली आहे.
समितीची पुढची बैठक ३ जुलै २०१७ रोजी लॉर्ड्स मैदानावर होईल.
आयसीसीने या सूचना मान्य केल्या तर यांना क्रिकेटच्या नव्या कोडमध्ये सामील करण्यात येईल. क्रिकेटच्या नव्या नियमांची अमंलबजावणी पुढच्या वर्षी १ ऑक्टोबरपासून होणार आहे. अर्थात पुढच्या वर्षी होणाऱ्या अॅशेस मालिकेत रेड कार्ड बघायला मिळू शकते.
इंग्लंडचा माजी कर्णधार माईक ब्रेयरलीच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करणे तसेच चारदिवसीय कसोटीवरसुद्धा विचारमंथन करण्यात आले. मात्र, यावर अद्याप सर्वसंमती झालेली नाही. ब्रेयरलीने म्हटले की, ‘मैदानावर खेळाडूंकडून शिस्तभंगाच्या घटनांत वाढ होत आहे.
यामुळे आम्ही रेड कार्डची शिफारस केली आहे. आमच्या शिफरशी मान्य करण्यात आल्या तर याची अंमलबजावणी देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली जाईल. याला क्रिकेटचे तिन्ही स्वरूप कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये सामील केले जाईल. पंच रेड कार्डचा उपयोग करून संपूर्ण सामन्यातून खेळाडूला बाहेर करू शकतील. यामुळे क्रिकेटमध्ये खूप मोठा बदल घडेल.
खेळाडूचे तात्पुरते निलंबन करायचे असेल तर यासाठी आम्ही यलो कार्डची सूचनासुद्धा दिली आहे. याशिवाय एमसीसीने बॅट आणि चेंडूत संतुलन ठेवण्यासाठी बॅटच्या आकारावर अंकुश लावण्याची सूचना केली आहे. बॅटीचा आकार कमी करण्यासाठी रिकी पॉटिंगने आग्रह केला आहे.
यामुळे रेड कार्ड
-वारंवार शिस्तभंग केल्यास
-पंचांना धमकी दिल्यास किंवा त्यांच्याशी असभ्य वर्तन केले तर
-खेळाडू, अधिकारी, प्रेक्षकांसोबत हिंसा केली तर
-खेळाच्या मैदानावर कोणत्याही प्रकारे हिंसक वर्तन केले तर
बातम्या आणखी आहेत...