आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एमडीएफ\' उमेदवारांची पहिली यादी जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील तिन्ही पुरोगामी आघाड्यांची मोट बांधून सशक्त असा तिसरा पर्याय उभा करण्याच्या बाता मारणार्‍या प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भारिपच्या पुढाकाराने बनलेल्या महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंटच्या ४२ उमेदवारांची परस्पर घोषणा करून टाकली.
आनंदराज आंबडेकर यांचा संविधान मोर्चा, भाई जयंत पाटील यांची महाराष्ट्र डावी समिती आणि प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र लोकशाही आघाडी यांनी एकत्रति येऊन राज्यात तिसरा पर्याय उभारण्याचे काही िदवसांपूर्वी जाहीर केले होते, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आणि महायुती यांच्याप्रमाणे या तथाकथति तिसर्‍या आघाडीतही मतभेद आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, तिन्ही आघाड्यांत एकत्रति येण्यावरून आजही सुंदोपसुंदी दिसत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सांयकाळी आपल्या महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंटचे ४२ उमेदवार जाहीर केले.
भारिपप्रणीत महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंटच्या ४२ उमेदवारांमध्ये धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर, मुंबई, जालना, मुंबई आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील मतदारासंघाचा प्रामुख्याने समावेश आहे.
महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंटने ४२ उमेदवार जाहीर करत असतानाच शेकाप, भाकप आणि माकप या आपल्या मित्रपक्षांचे प्राबल्य असलेल्या १६ मतदारसंघांत उमेदवार द्यायचे नाहीत, असे स्पष्ट केले.
शुभपितृपंधरवडा : पितृपक्षअपवित्र असल्याने राजकीय पक्षांनी निर्णय घेण्यास विलंब केला आहे. "पूर्वजांना नमन करणे अपवति्र कसे?' असा सवाल या फ्रंटने केला आहे.

विद्यमानांना तिकीट
भारिपबहुजन महासंघाचे सध्या दोन आमदार आहेत. पक्षाच्या दोन्ही विद्यमान आमदारांना (बाळापूर-बळीराम सिसरसकर, अकोला पूर्व-हरिभाऊ भदे) भारिप-बहुजन महासंघाने २०१४ च्या निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवली आहे.
आंबेडकर विरुद्ध आंबेडकर
संविधानमोर्चा नावाने नुकत्याच स्थापन झालेल्या आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर आहेत. आनंदराज हे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू. मात्र, दोघा बंधूंच्या आघाड्या एकत्र येता वेगवेळ्या लढणार हे आज निश्चति झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत "आंबेडकर विरुद्ध आंबेडकर' असा सामना पाहावयास मिळणार आहे.