आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medha Patkar News In Marathi, Aap Arivind Kejariwal

मेधा पाटकर केजरीवालांवर नाराज; 'आप'ची मोठी हानी होईल- इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे तुटले असताना त्याबाबत चिंतन करायचे सोडून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे तुरुंगात जाऊन बसले असल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘आप’च्या नेत्या मेधा पाटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांना वेळीच सावरले नाही, तर पक्षाची मोठी हानी होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पाटकर म्हणाल्या, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच आप लोकसभा निवडणुकीला सामोरा गेला. निवडणुकीत जो पराभव झाला त्याबद्दल दु:ख वाटणे स्वाभाविक आहे. पराभवाने पक्षाला हादरा बसला आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चिंतन बैठका आयोजित केल्या पाहिजेत. मात्र, पक्षाचे नेते याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. पाटकर यांनी मुंबई- उत्तर- पूर्व मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे किरीट सोमय्या यांनी बाजी मारली.

सोमय्या यांनी मतदारांपर्यंत जाऊन आपले म्हणणे मांडले. मात्र, पाटकर यांना यात यश आले नसल्याचे एका कार्यकर्त्यांने सांगितले.सोमय्या यांच्या विरोधातही पाटकर यांनी तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वीच ‘आप’ मुंबईत बैठक झाली. मात्र, दिल्लीतून या बैठकीला एकही वरिष्ठ नेता हजर नव्हता.