आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमत विद्यापीठ मेडिकल प्रवेशाचे अधिकार संपुष्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिमत विद्यापीठास वैद्यकीय प्रवेश देण्याचे अधिकार नसून त्यांनी सध्याच्या रिक्त जागा व दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशापूर्वी प्रवेश दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी शासनास सादर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.
दरम्यान, या आदेशामुळे आता रिक्त असलेल्या सर्व जागा केंद्रीयकृत पद्धतीने भरल्या जाणार आहेत. यासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. अभिमत विद्यापीठामधील प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. वैद्यकीय प्रवेशासंदर्भात शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या स्थगिती आदेशाच्या अगोदर अभिमत विद्यापीठांनी केलेले सर्व प्रवेश वैध ठरवले आहेत. त्यानंतर रिक्त जागा गुणवत्तेच्या आधारे भरल्या जाणार आहेत. केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून जागा भरण्यात येणार असल्याने विद्यार्थी-पालकांनी आनंद व्यक्त केला. या निकालाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे.
बातम्या आणखी आहेत...