आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यादा व्हॉटसअॅपवर पाठवला असा मेसेज, त्यानंतर या मुलीने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई-वडिलांची नाचक्की होऊ नये यासाठी ती शिक्षण अर्धवट सोडून देऊ इच्छित नव्हती. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
आई-वडिलांची नाचक्की होऊ नये यासाठी ती शिक्षण अर्धवट सोडून देऊ इच्छित नव्हती. (संग्रहित फोटो)
मुंबई- नायर हॉस्पिटल दंत महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका मुलीने आपल्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या केली. या मैत्रिणीने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिंनीचा मेसेज मिळाल्यावर लगेच ती राहत असलेल्या ठिकाणी धाव घेतली पण विद्यार्थिंनीने त्यापूर्वीच आत्महत्या केली होती.
 
या कारणामुळे होती त्रस्त
- कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील भाग्यलक्ष्मी मुठा (20) नायर मेडिकल डेंटल महाविद्यालयात द्वितीय वर्षाची विद्यार्थिंनी होती.
- तिने मंगळवारी हॉस्टेलमध्ये फाशी घेतली. तिने तत्पूर्वी आपल्या एका मैत्रिणी व्हॉट्सअॅपवर याबाबत माहिती दिली.
- तिच्या मैत्रिणीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. भाग्यलक्ष्मीने मात्र दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केली. 
- दुपारी तिची रुम मेट तिच्या रुमवर पोहचली तेव्हा भाग्यलक्ष्मी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसली. तिने तातडीने वॉर्डनला ही बाब सांगितली. तिला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
 
या कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल
भाग्यलक्ष्मीला बीडीएसचा अभ्यासक्रम अतिशय कठिण वाटत होता. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. ​
- आपण शिक्षण अर्धवट सोडल्यास आपल्या आई-वडिलांची नाचक्की होईल, असे तिला वाटत होते.
- रेडिओलॉजीच्या मैत्रिणीला पाठवलेल्या संदेशात तिने आपल्याला बीडीएसचा अभ्यासक्रम खूपच कठीण वाटत असल्याचे तिने सांगितले.
- घरच्यांनी आपल्या शिक्षणासाठी खूप खर्च केला असून आपण शिक्षण अर्धवट सोडणे योग्य नसल्याचेही तिचे मत होते.
- मी निराश असून जीवन संपवू इच्छित असल्याने तिने मैत्रिणीला कळवले होते. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...