आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 जिल्ह्यांत वैद्यकीय चाचणी लॅब; शासकीय रुग्णालयांतच सर्व चाचण्यांची सोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी व तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करून घेण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळा  सेवा उपलब्ध होणार असून औरंगाबादसह १६ जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांत ही सेवा काही प्रमाणात सुरू झाली.

केंद्राचा उपक्रम असलेल्या एचएलएल लाइफकेअर लिमिटेडसोबत या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार केला आहे. आतापर्यंत पुणे, ठाणे, नंदुरबार, जालना, बीड, रायगड, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, रत्नागिरी, धुळे, गोंदिया, जळगाव, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग या १६ जिल्ह्यांतील काही शासकीय रुग्णालयांत  काही प्रमाणात ही सेवा उपलब्ध झाली आहे. 

टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर शासकीय रुग्णालयांत त्याचा विस्तार होणार आहे. करारानुसार एचएलएल लाइफकेअर ही कंपनी राज्यात विविध ठिकाणी लॅब स्थापन करणार आहे. लॅबला संलग्न शासकीय रुग्णालये व संस्थांमधून नमुने संकलन करुन लॅबमध्ये आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क शासनाकडून दिले जाणार असून त्यामुळे रुग्णांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.

नमुने संकलन असे...
प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, ग्रामीण रुग्णालये,५० खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या रुग्णलयांत ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत,१०० पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांत सकाळी ८ ते दुपारी १.३० व सायंकाळी ४ ते ६.३० वाजेपर्यंत नमुने घेतील.
बातम्या आणखी आहेत...