Home | Maharashtra | Mumbai | meera borvankar retired after 36 years service carrier as a ips officer

मीरा बोरवणकर 36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त, राज्याच्या पहिल्या महिला IPS अधिकारी

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 08, 2017, 11:58 AM IST

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर 36 वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्त झाल्या.

 • meera borvankar retired after 36 years service carrier as a ips officer
  मुंबई- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर 36 वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्त झाल्या. मीरा जेव्हा तुरुंग महानिरीक्षक होत्या तेव्हा त्यांनी संजय दत्तला तुरुंगातील जेवणच दिले. अजमल कसाब आणि याकूब मेमनला त्यांच्या निगराणीतच फाशी देण्यात आली. त्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख होत्या तेव्हा दाऊद इब्राहिमची बहीण त्यांना एवढी घाबरली होती की, त्यांच्या बदलीसाठी तिने विशेष नमाज अदा केली होती.
  मीरा यांचे वडील बीएसएफमध्ये अधिकारी होते. पंजाबमधूनच त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. 1981 मध्ये त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. पहिल्यांदा त्या 1994 मध्ये प्रामुख्याने चर्चेत आल्या होत्या. त्यांनी तेव्हा जळगाव सेक्स स्कँडलचा तपास केला होता. त्यात अनेक नेते आणि प्रभावशाली लोक सहभागी होते. नंतर त्या जेव्हा मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा हे पद मिळवणाऱ्या त्या पहिला महिला होत्या. तेथे अंडरवर्ल्डवरील कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली. त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले.
  दाऊदची बहीण हसीना भावाच्या नावावर वसुली करत आहे, अशा बातम्या मुंबई गुन्हे शाखेकडे अनेकदा येत असत. एक दिवस एक तक्रार आली, पण एफआयआर लिहीत असताना तक्रार करणारी महिला गायब झाली. मीरांनी तिचा खूप तपास केला. त्यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा यांची भीती वाटायला लागली. नंतर एक रेकॉर्डिंग मीरांपर्यंत पोहोचले. त्यात हसीना ही एक विशेष नमाज अदा करा, या मीरा बोरवणकर यांची बदली करा,' असे म्हणत असल्याचे ऐकू येते.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, मीरा बोरवणकर यांच्याविषयी...

 • meera borvankar retired after 36 years service carrier as a ips officer
  पोलिस विभागात त्यांची कठोर अशी ख्याती आहे. तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी संजय दत्तला थोडाही दिलासा दिला नाही. संजय काय करत आहे हे पाहण्यासाठी त्या अचानक येरवडा तुरुंगात गेल्या. पहिल्यांदा तर आपण कुठे जात आहोत हे त्यांनी आपल्या चालकालाही सांगितले नव्हते. अचानक त्यांनी येरवडा तुरुंगाकडे मोर्चा वळवला. जिथे संजय दत्त होता तिथे थेट गेल्या. तिथे अनेक पुस्तकं, पटकथा आहेत असे त्यांना दिसले. संजयला त्यांच्याबद्दल माहिती होतील. तो मीरा यांना म्हणाला,'तुम्ही पंजाबी आहात. फजिल्काच्या आहात.' 
 • meera borvankar retired after 36 years service carrier as a ips officer
  कसाबच्या फाशीसाठी स्वत:ला असे तयार केले-
   
  कारागृहाच्यानियमांनुसार फाशी देण्यात येणाऱ्या व्यक्तीची उंची वजन तपासले जाते. त्यानंतर वाळू भरलेल्या बॅगपासून एक प्रतिकृती तयार केली जाते फाशी देण्याचा सराव केला जातो. कसाबच्या प्रकरणात ही सर्व प्रक्रिया मीरा बाेरवणकर यांच्यासमाेर झाली; परंतु ही प्रक्रिया प्रथमच पाहिल्याने त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास झाला. फाशी देण्यापूर्वी मला स्वत:ला तयार करावे लागले. त्यासाठी मी स्वत:ला बजावले की, मी केवळ माझे कर्तव्य करत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी फाशीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांचे समुपदेशन केल्याचे सांगितले 
 • meera borvankar retired after 36 years service carrier as a ips officer
  पुस्तकही लिहिले... 
   
  मीरा बोरवणकर यांनी नुकतेच एक पुस्तक 'लीव्ह्ज ऑफ लाइफ'देखील प्रकाशित केलेय. हे पुस्तक पोलिस कारकिर्दीमधील त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे. या पुस्तकात रेखाटने असून, पुस्तक अत्यंत साध्या-सरळ भाषेत लिहिले आहे. हे पुस्तक तरुणांसाठी विशेषत: १४ ते २५ वर्षे वयाच्या मुलींसाठी आहे. बालिवूडमध्ये बनलेला 'मर्दानी' चित्रपट त्यांच्याच जीवनावर आधारित असून, यावरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावता येतो. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. 

Trending