आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही ‘मर्दानी’ होऊ शकते मुंबईची CP, SEX रॅकेट पकडून प्रकाशझोतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा बोरवणकर - फाइल फोटो - Divya Marathi
मीरा बोरवणकर - फाइल फोटो
मुंबई- मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्‍यामुळे आता मुंबई पोलिस आयुक्‍त पदासाठी पोलिस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश माथूर, पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर, पुण्याचे पोलिस आयुक्त के.के. पाठक आणि डी.डी. पाडसळगीकर यांची सर्वात पुढे आहेत. यापैकी मीरा बोरवणकर या एकमेव महिला आहेत. त्‍यांच्‍या विषयी खास माहिती divyamarathi.com साठी...
जळगावमध्‍ये सेक्स रॅकेट पकडल्‍याने मीरा प्रकाशझोतात
वर्ष 1994 जळगाव जिल्‍ह्यातील एक मोठे सेक्स रॅकेट पकडण्‍यात आले होते. यामध्‍ये शालेय विद्यार्थिपासून ते महाविद्यालयीन युवतींना वेश्‍या व्‍यवसायात आणले जात होते. हा प्रकार उघडकीस आणण्‍यास मीरा यांचे मोठे योगदान आहे. या कारवाईमुळे मीरा या देशभर प्रकाशझोतात आल्‍या होत्‍या. तोच धागा पकडून गतवर्षी ‘मर्दानी’ हा चित्रपटसुद्धा आला होता. यात राणी मुखर्जी यांनी मीरा यांची भूमिका साकारली होती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, 1981 बॅचची आयपीएस अधिकारी आहेत मीरा... सरकारने सोपवली होती याकूबच्‍या मृत्‍यूदंडाच्‍या देखरेखीची जबाबदारी... 'मर्दानी'चे कथानक मीरा यांच्‍या जीवनावर...