आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनमोल स्वत:सोबत कंपनीसाठी भाग्य घेऊन आला : अनिल अंबानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिलायन्स कॅपिटलच्या स्टॉक्समध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली असून अनमोल अंबानी याचा कंपनीच्या संचालक मंडळामध्ये समावेश झाल्यामुळे तो सोबत भाग्य घेऊन आला असल्याचे मत कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी व्यक्त केले आहे. कार्यकारी संचालक म्हणून अनमोलचा कंपनीतील प्रवेश कंपनीसाठी भाग्याचा ठरला असून पुढील काळातही हा “अनमोल इफेक्ट’ कायम राहणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत (एजीएम) मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अनिल अंबानी यांनी या वेळी विविध क्षेत्रांत कंपनीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या मोठ्या निर्णयांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी विविध प्रकारांत कंपनीच्या लिस्टिंगपासून ते कर्ज कमी करण्यापर्यंतच्या सर्व योजनांचा खुलासा केला. कंपनी आपल्या विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये काम करत असून त्यानुसार गृहकर्ज व्यवसायाची लिस्टिंग एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कमर्शियल फायनान्स आणि विमा व्यवसायाची लिस्टिंगदेखील योग्य वेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये शेअरधारकांच्या हिताचा विचार करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. ग्राहकोपयोगी वस्तू कर्ज व्यवसायाला स्वतंत्ररीत्या विकसित करण्यात येणार आहे. तसेच कमोडिटी एक्स्चेंजला रिलाँच करण्याचाही विचार त्यांनी बोलून दाखवला. डायमंड तसेच कच्चे तेल फ्यूचर्सवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डायमंड फ्यूचर कंपनी फ्लॅगशिपचे उत्पादन करणार असून याचे दर दिवसाचे सरासरी टर्नओव्हर ६००० कोटी करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मान्सूनचाफायदा : चांगलामान्सून बरसल्याने कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा असून महागाई दर नियंत्रणात राहून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल, अशी अपेक्षा अनिल अंबानी यांनी व्यक्त केली. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत चांगले संकेत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीच्या एजीएममध्ये अनमोल आणि अनिल अंबानी
एका वर्षात स्टॉक्स ७० टक्के वाढले
अंबानीम्हणाले की, माझा मुलगा युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतो. रिलायन्स कॅपिटल हीदेखील युवकांची कंपनी असल्याचे ते म्हणाले. कंपनीत कर्मचाऱ्याचे सरासरी वयोमान ३४ वर्षे आहे. अनमोल यांचा २३ ऑगस्ट रोजी अतिरिक्त संचालक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळात समावेश झाला. अनमोलचा समावेश झाला तेव्हा स्टॉक ४६७ च्या पातळीवर होता, सध्या तो ५७५ च्या पातळीवर आहे, तर गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये ७० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अनमोल कंपनीत आल्यापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

धीरूभाईंचे स्वप्न साकार करणार
भाऊमुकेश अंबानी यांच्यासोबत मिळून आपण वडील धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अनिल अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि जिओ यांच्यादरम्यान असोसिएशनसंबंधी त्यांनी माहिती दिली. रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स जिओ यांच्यादरम्यान व्हर्च्युअल मर्जर पूर्ण झाले असल्याचेही ते म्हणाले. रिलायन्स जिओसोबतच स्पेक्ट्रम ट्रेडिंग आणि शेअरिंगसोबतच त्यांच्याकडे जी, जी आणि जीसाठी आवश्यक असणारे स्पेक्ट्रम असल्याचेही अनिल अंबानी यांनी कंपनीच्या सदस्यांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...