आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Entire Family Of India Richest Man Mukesh Ambani.

PHOTOS : हे आहे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब, जाणून घ्‍या कोण काय करतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबानी आपल्‍या कुटुंबासह. - Divya Marathi
मुकेश अंबानी आपल्‍या कुटुंबासह.
मुंबई - फोर्ब्स इंडियाने भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंत व्‍यक्‍तींची यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये मुकेश अंबानी यांनी सलग नवव्‍या वर्षी पहिले स्‍थान प्राप्‍त केले. अंबानी यांची एकूण संपत्‍ती 18.9 अब्‍ज अमेरिकन डॉलर एवढी आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आज मुकेश यांच्‍या जीवनासंबंधी एका मालिकेद्वारे माहिती देणार आहे. त्‍यामध्‍ये पहिल्‍या भागात आम्‍ही तुम्‍हाला त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांची ओळख करून देणार आहोत.
हे आहे अंबानी कुटुंबीयांचे भविष्य
मुकेश हे रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, प्रबंध संचालक आणि कंपनीचे सर्वात मोठे शेअरधारक आहेत. मुकेश यांच्‍या पत्‍नी नीता या रिलायंस इंडस्ट्रीजच्‍या माध्‍यमातून सामाजिक आणि धार्मिक काम करतात. या दामत्‍याला आकाश, इशा आणि अनंत ही तीन मुले आहेत. यामध्‍ये अनंत सर्वांत लहान आहे. आकाश आणि इशा यांनी गत वर्षीच कंपनीच्‍या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्‍ये समाविष्‍ट केले गेले. तर मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत सध्या शिक्षण घेत आहेत. मुकेश यांचा छोटा भाऊ अनिल अंबानीला दोन मुले आहे. अनिलनेसुद्धा त्यांचा मोठा मुलगा जयला मागील वर्षी कंपनीच्या पॉलिसी मेकर्स लिस्टमध्ये सामील केले होते, तर छोटा मुलगा अनमोल सध्या शिक्षण घेत आहे.
मुकेश अंबानी यांच्‍या पगाराचे विवरण
मुकेश अंबानी यांचा पगार 15 कोटी रुपये आहे. मागील तीन वर्षांपासून आपल्‍या इन्क्रीमेंट घेतले नाही.
वेतन आणि भत्ते = 4.16 कोटी रुपये.
सेवानिवृत्त लाभ = 83 लाख रुपये
कमीशन आणि लाभ = 9.41 कोटी रुपये

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या
1.मुकेश आणि नीतांची कुठे झाली पहिली भेट...
2. मुकेश यांच्‍या बहिणी काय ?
3. मुलं काय करतात ?