आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Hetal Dave, India's First Professional Woman Sumo Wrestler

ही आहे देशातील पहिली महिला सुमो पहिलवान, आई-वडिलांना लग्‍नाची चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमो पहिलवान म्‍हटले की, आपल्‍यासमोर उभा राहतो तो अव्‍याढव्‍य पुरुष. पण, आज आम्‍ही तुम्‍हाला भारतातील पहिल्‍या आणि एकमेव महिला सुमो पहिलवानाविषयी सांगणार आहोत. विशेष म्‍हणजे या तरुणीने सुमो बनण्‍यासाठी ना मांसाहार केला ना कोणत्‍याही प्रकारची पावडर घेतली. हेतल सुधीर दवे (वय 29) असे तिचे नाव असून, ती मुंबईत राहते. 2009 मध्‍ये ताईवानमध्‍ये झालेल्‍या जागतिक सुमो कुस्‍तीस्‍पर्धेत तिने पाचवा क्रमांक प्राप्‍त केला होता. मात्र, भारताला जागतिक सुमो कुस्‍ती स्‍पर्धेत खेळण्‍याची मान्‍यता नसल्‍याने ती इच्‍छा असूनही भारताचे प्रतिनिधित्‍व करू शकत नाही.
लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्‍ये नाव नोंद
मुंबईमध्‍ये राहणाऱ्या हेतल हिचे नाव लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्‍ये आहे. पण, आता तिचे आईवडील तिच्‍या लग्‍नाच्‍या तयारीत आहेत. पण, यामुळे तिच्‍या करिअरवर परिणाम होऊ नये, असे तिच्‍या वडिलांना वाटते.

पुढील स्लाइड्सवर पाहा हेतलचे फोटोज....