आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet India Richest Dance Bar Girl Tarannum Khan.

ही आहे देशातील सर्वात श्रीमंत BAR GIRL, एका रात्रीत कमवायची 90 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार गर्ल तरन्नूम खान (फाईल फोटो) - Divya Marathi
बार गर्ल तरन्नूम खान (फाईल फोटो)
मुंबई- सुप्रीम कोर्टाने राज्यातील डान्स बारवरील बंदी उठविण्याचा निर्णय सहा महिन्यापूर्वीच घेतला होता. मात्र, राज्य सरकार पुन्हा कोर्टात गेल्याने अद्याप डान्स बार सुरु होऊ शकलेले नाहीत. मात्र, सुप्रीम कोर्टाने बुधवारी आणखी एक निर्णय देताना अटींची पूर्तता करणा-या डान्स बारना येत्या 10 दिवसांत परवाने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखेर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राज्यात पुन्हा एकदा छम छम सुरु होणार आहे.
महाराष्ट्रात 2005 पासून डान्स बार बंद आहेत. तत्कालीन गृहमंत्री व स्वर्गीय आर आर पाटील यांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला होता. डान्स बार बंदीला मोठा विरोध होऊनही त्यावेळी आबांनी माघार घेतली नाही. मात्र, आता 11 वर्षानंतर बार सजलेले दिसतील.

2005 साली डान्स बार बंद झाल्यानंतर प्रसिद्ध बार गर्ल दुबई व बॅंकॉक येथे निघून गेल्या होत्या. तर, काही वेश्याव्यवसायात ओढल्या गेल्या. एक काळ असाही होता की मुंबईतील व नवी मुंबईतील डान्स बार रात्रभर खुले असायचे व बार गर्ल्सवर लाखो, कोट्यावधीची उधळण व्हायची. डान्स बारमुळे मुंबईतील तरन्नुम खान नावाची एक डान्सर (बार गर्ल) ने खूप प्रसिद्धी व पैसा कमाविला होता. त्यामुळेच तरन्नुमला देशातील सर्वात श्रीमंत बार गर्ल म्हटले जाते. तिच्यावर एका रात्रीत 90 लाख रूपये उधळले गेल्याचे सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला तरन्नूमची कहानी सांगणार आहोत....
मुंबईतील 93 च्या दंगलीने बदलले जीवन-
मुंबईतील अंधेरी परिसरात तरन्नुमचे वडील एक छोटेसे दुकान चालवायचे. तरन्नुमच्या कुटुंबात भाऊ-बहिणीसह एकून सहा लोक होते. याच दुकानातून त्यांचे कसेबसे घर चालायचे. मुंबईत डिसेंबर 92 ते जानेवारी 93 मध्ये हा धार्मिक हल्ले झाले. यात तरन्नुमचे घर, दुकान सर्व तोडून फोडून टाकले होते. तरन्नूमचे कुटुंब रस्त्यावर आले होते. त्यांना सरकारच्या वतीने लावलेल्या रिलीफ कॅंपमध्ये राहण्याची वेळ आली. यानंतर घडलेल्या घटनेने तरन्नूमच्या वडीलांना ह्दयविकाराचा आजार जडला व ते अंथरूणाला खिळून पडले. घरातील सर्वात थोरली मुलगी तरन्नूम दोन-चार हजाराची नोकरी शोधू लागली. मात्र तीही तिला मिळाली नाही. अखेर घर चालविण्यासाठी तिने बार गर्ल बनण्याचे ठरविले.
एका रात्रीत 90 लाख रूपये कमविले-
वयाच्या 16 व्या वर्षी तरन्नुम मुंबईतील दीपा बारमध्ये बार गर्ल म्हणून काम करू लागली. ग्राहकांना ऑर्डरप्रमाणे जेवण-दारू देऊ लागली. बारमध्ये काम करू लागल्यावर टिकून राहण्यासाठी तिला डान्स शिकायला सांगितले. काही दिवसातच ती डान्समध्ये तरबेज झाली. उंचपूरी व देखणी तरन्नूम ग्राहकांची आवडती बार गर्ल बनू लागली. काही दिवसातच तरन्नूमचा जलवा मुंबईभर परसला. अनेक लोक तिच्या डान्सच्या दिवाने झाले. या काळात तरन्नुमवर एका रात्रीत लाखो रूपये उडवणारे अनेक जण होते. याचमुळे काही दिवसात तरन्नुम मुंबईतील करोडपती बार गर्ल बनली. तरन्नुम मुंबईतील सर्वात सुंदर बार गर्ल म्हणून चर्चेत आली. तिच्यावर एका रात्रीत 90 लाख रुपये उधळल्याची घटना समोर आली होती.
पुढे वाचा, तरन्नुमच्या घरावर टाकला होता छापा....