आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका अपघातामुळे या डेंटिस्टला बसावे लागतेय व्हीलचेयरवर, आज फॅशन जगात मोठे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस पॉप्पुलरचा किताब जिंकला आहे राजलक्ष्मीने.... - Divya Marathi
मिस पॉप्पुलरचा किताब जिंकला आहे राजलक्ष्मीने....

मुंबई/बेंगलुरु- एक घटना तुमचे संपूर्ण जीवनच बदलू शकते. मात्र, काही जण असेही असतात की मोठ-मोठ्या दुर्घटनांना ती आपली कमजोरी नाही तर ताकद समजून मोठे यश संपादन करता. यापैकीच एक आहे बंगळुरुची राहणारी राजलक्ष्मी. राजलक्ष्मीने मुंबईत झालेल्या मिस व्हीलचेयर इंडिया हा किताब जिंकला आहे. राजलक्ष्मीने काही दिवसापूर्वी पोलंडमध्ये आयोजित मिस व्हीलचेयर वर्ल्ड वाईड 2017 स्पर्धेत मिस पॉप्पुलर किताब आपल्या नावावर कोरला होता. एक टॅंलेंट डेंटिस्टसोबतच ती ऑर्थो डेंटिस्ट आणि फिलॉन्थ्रोपिस्ट सुद्धा आहे. एका अपघाताने बदलले लाईफ...

 

- वर्ष 2007 ची ही घटना आहे. बीडीएसची एग्जाम दिल्यानंतर ती नॅशनल कॉन्फ्रेंसमध्ये पेपर प्रेजेंट करण्यासाठी चेन्नईला जात होती. यात दरम्यान रस्त्यात तिचा अपघात झाला.  
- या अपगातात तिला स्पायनल इन्जूरी झाली आणि तिच्या पायाला पॅरालिसीसची शिकार ठरली. मात्र, राजलक्ष्मीने कधी हार मानली नाही. तिने अनेक सर्जरी करून घेतल्या मात्र, पाय ठीक झाला नाही. 
- डॉक्टरांनी तिला सांगितले की, आता तुला आयुष्यभर व्हीलचेयरवर बसावे लागेल. मात्र, राजलक्ष्मीला आपले स्वप्न करण्यासाठी शारिरीक विकलांगता आड आले नाही किंवा ओळख बनविण्यास अडसर ठरले नाहीत.
- या अपघातानंतर तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. मात्र, राजलक्ष्मीने हार मानण्याऐजी सायकॉलोजी आणि फॅशनमध्ये आपली आवड जोपासायला सुरूवात केली. 
- जेव्हा तिला मिस वील चेयर इंडियाच्या स्पर्धेबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने त्यात सहभाग घेण्याचे ठरवले.
- 2014 मध्ये मुंबईत आयोजित केलेल्या स्पर्धेत जिंकणे तिच्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते.

 

अनंत अडचणी येऊनही नाही मानली हार- 

 

- शारिरीक दृष्ट्या कार्यक्षम नसतानाही तिने डेटिंस्टमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. पुढे सायकोलॉजी, फॅशन डिझायनिंग, वेदिक योगा यासारखे कोर्स केले. 
- एवढेच नव्हे तर वर्ष 2015 च्या फॅशन वीकमध्ये तिने रॅम्पवर आपले जलवे दाखवले. डेंटल सर्जरीत मास्टर्स करताना तिने गोल्ड मेडल जिंकले होते.
- मात्र, दुदैवाने गोल्ड मेडल मिळवूनही तिला डेटिंस्टमध्ये नोकरी मिळाली नाही. मात्र, तिने प्रयत्न सोडले नाहीत अखेर तिला एका डेंटल कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. 
- याशिवाय ती स्वत:चे एक डेंटल क्लीनिक चालवते. जेनेटिक्स रिसर्च प्रोजेक्टवर ती काम करते. नॅशनल कन्वेंशनमध्ये पेपर आणि पोस्टर प्रेजेंट केले आहेत.
 
व्हीलचेयरवरून मुलांना देते ट्रेनिंग-

 

- राजलक्ष्मी शाळेत जाऊन मुलांसाठी फ्रीमध्ये डेंटल हेल्थ कॅम्प लावते. व्हीलचेयरवर असणा-या मुलांसाठी ती वेगळी ट्रेनिंगची व्यवस्था करते. 
- ती एस.जे फाउंडेशनची चेयरपर्सन राहिली आहे. तिचे हे फाउंडेशन शारीरिक दृष्ट्या विकलांग लोकांना मदत करते. 
- मिस व्हीलचेयर इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने पुढच्याच वर्षी आपल्या फाउंडेशनच्या वतीने मिस पिजेंटचे आयोजन केले होते. 
- राजलक्ष्मीने व्हीलचेयर बास्केटबॉल आणि व्हीलचेयर डान्स प्रोग्रॅममध्ये भाग घातला आहे. तिच्या कामाचे वेगवेगळ्या स्तरावर नेहमीच कौतूक होत आले आहे. तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, राजश्रीचे काही निवडक फोटोज......

बातम्या आणखी आहेत...