आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे अदृश्य हात भाजपच्या पाठीशी! विधान परिषद निवडणूक : शरद पवार-मुख्‍यमंत्री चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे वगळता भाजपच्या काेणत्याही उमेदवाराला मदतीचे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस संयुक्त उमेदवार देणार असल्याचे घाटत असताना पवार व मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय चर्चा घडवणारी ठरली.

 

नारायण राणे यांना पुन्हा पोटनिवडणुकीस उभे केल्यास कोण-कोण कितपत मदत करू शकेल याची चाचपणी सध्या भाजपने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत परिषद निवडणुकीवर चर्चा झाली. तसेच उमेदवार कोण असावा, यावरही प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अशी चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाकारले.


निमित्त योजनेबाबत चर्चेचे
राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले, शरद पवार यांनी नुकताच विदर्भ मराठवाड्याचा दौरा केला होता. यात आलेले अनुभव, तेथे असलेली समस्या याबाबत त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावयाचीच होती. त्यानुसार गुरुवारची वेळ घेतली होती. या भेटीत त्यांनी विदर्भ मराठवाड्यासाठी कोणत्या योजना हाती घेणे आवश्यक आहे ते सांगितले असेही सांगण्यात येत आहे.

 

मुख्यमंत्री-अजितदादाही सहप्रवासी!
मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादेत बराच वेळ एकत्र होते. एकाच विमानातून ते आले होते. अर्थातच दोघांत चर्चा झाली. गुरुवारी शरद पवार यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या चर्चेत पोटनिवडणुकीचा विषय निघालाच नसेल, असे म्हणता येणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...