आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting For Drought Eradication : State Government Say To High Court

दुष्काळ निवारणासाठी बैठक घेणार : राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सांगली परिसरातील दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. या उपाययोजनांसंदर्भातील माहिती 25 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या वेळी दिले.

टेंभू उपसा सिंचन योजनेचे काम सध्या अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे सांगलीतील आटपाडी व परिसरातील दुष्काळाची तीव्रता आणखी वाढली आहे. या योजनेचे काम तिस-या टप्प्यात असून निधीअभावी ते थांबले आहे. या कामाला लवकर गती देण्याचे आदेश जारी करावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका माजी आमदार अनिल बाबर यांनी उच्च दाखल केली आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने या भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यासाठी राज्य सरकारने संबंधित विभागांची बैठक घेऊन दुष्काळ निवारण योजनेची रूपरेषा ठरवण्यासाठी राज्य सरकारने चार आठवड्यांची मुदत मागितली. परंतु दुष्काळाशी निगडित उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यास विलंब न लावण्याविषयी न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होईल.