आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मार्गावर रविवारी मेगाब्लाॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मध्य तसेच हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार अाहे. त्यामुळे लाेकल गाड्या अापल्या गंतव्य स्थानी वीस मिनिटे उशीरा पाेहोचण्याची शक्यता अाहे. रविवारी कल्याण – ठाणे या मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन या वेळात जलद मार्गावर मेगाब्लाॅक असेल. या कालावधीत कलयाण येथून अप दिशेने सुटणाऱ्या जलद गाड्या कल्याण- ठाणे यादरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. या सर्व गाड्या अापल्या नियोजित स्थनकांशिवाय मुलुंड, भांडूप, विक्राेळी, घाटकाेपर, कुर्ला , दादर, भायखळा या स्थानकांवर थांबतील. सीएसटी स्थानकावरून सकाळी १० ते दुपारी २.४२ दरम्यान सुटणाऱ्या सर्व डाऊन फास्ट गाड्या अापल्या निर्धारित स्थानकांशिशवाय अन्य स्थानकांवर थांबतील. या काळात लाेकल अापल्या नियाेजित ठिकाणी १५ ते २० मिनिटे उशीरा पाेहोचण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...