आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्वरील टीकेनंतर भाजपने तोडली चुप्पी, फोटोशुटवर मेघना आनंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर आता बॉलिवूड बालाही फिदा होऊ लागल्या आहेत. मोदींच्या दिवान्या असलेल्या अभिनेत्रींमध्ये आता मेघना पटेलचा समावेश झाला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या मेघनाने मोदींच्या समर्थनार्थ न्यूड फोटोशूट केले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर त्यावर जोरदार टीका झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मेघनाच्या या प्रचार पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते माधव भंडारी यांनी मेघनाच्या छायाचित्रावर आक्षेप घेतला आहे. ही भाजपची संस्कृती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कायदे तज्ज्ञांच्या मते यात मोदींचे नाव आल्याने, त्यांच्या छायाचित्रांचा आणि नावाचा वापर करुन सार्वजनिकरित्या कोणी चूकीचे काम करीत असले तर भाजप त्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकते.
मेघनाने भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळ फुलांमध्ये न्यूड फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिच्या हातात नरेंद्र मोदींचे पोस्टर असून त्यानेच तिने लाज झाकण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून तिने मोदींसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मेघनाचे ही छायाचित्रे सोशल साइट्सवर वेगाने पसरत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. Am An Anarchist ‏@IAmAnAnarchist ने ट्विट केले आहे, की भाजप आता आणखी कोणत्या पातळीवर खाली उतरणार आहे.
अनेकांनी या फोटोशूटला भाजप प्रचारापेक्षा मेघनाचा प्रसिद्धी स्टंट म्हटले आहे. Kavitha Reddy ‏@kavithareddy16 ट्विट केले आहे, 'मेघना पटेल मोदींचे समर्थन करीत आहे.... वेगळ्या पद्धतीने याकडे पाहिले तर, भक्त आता फक्त मेघनाचेचे चित्रपट पाहातील.'
MAULIN SHAH ‏@maulinshah9 यांनी ट्विट केले आहे, 'हा मोदींच्या सायको टीमचा परिणाम आहे. तेच अशी लाजिवाणी गोष्ट करु शकतात. हा महिलांचा अपमान असून मोदी आणि त्यांची टीम महिला विरोधी आहे.'
पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे मेघना