आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिमंद मुलींचा लैंगिक छळ; सहा जण दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कळंबोली येथील कल्याणी महिला बाल सेवा संस्थेतील अल्पवयीन गतिमंद मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी सहा आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
संस्थेचा संस्थापक रामचंद्र करंजुले, नानाभाऊ लक्ष्मण करंजुले, कर्मचारी खंडू नानाजी कसबे, प्रकाश विठ्ठल खडके, व्यवस्थापिका सोनाली मोहन बडदे आणि पार्वती श्यामसुंदर मावळे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप ठेवण्यात आले होते. या वेळी आरोपींना कुत्र्याची उपमा देत मुख्य आरोपी रामचंद्रला फाशीच्या शिक्षेची मागणी सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केली. या गतिमंद मुलींना न्याय मिळाला, असा संदेश देण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याचीही मागणी केली.
मार्च 2011 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. करंजुले याने संस्थेच्या इतर कर्मचाºयांसह संस्थेतील 14 ते 18 वयोगटातील 20 गतिमंद मुलींचा लैंगिक छळ केला होता. त्यातील 4 मुली कर्णबधिर व मूक आहेत. त्यांच्या अत्याचारांना विरोध करणाºया मुलींना जिवे मारण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला होता. तसेच, आरोपी या मुलींचा गरम चमचा व सिगारेटचे चटके देऊन छळ करत असा जबाब या मुलींनी दिला होता. बालकल्याण समितीने या संस्थेला भेट दिल्यानंतर संस्थापक व कर्मचाºयांकडून होणारा हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मागील वर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
............................................