आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णय : आता वैद्यकीय अधिकारी होणार 60 व्‍या वर्षी निवृत्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट '' मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा निर्णय आज (मंगळवारी) मंत्रीमंडळांनी घेतला. त्‍याची अंमलबजावणी 31 मे 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे.

राज्‍यातील आरोग्‍य सेवेसाठी अजूनही आवश्‍यक तेवढे मनुष्‍यबळ नाही. दरम्‍यान, एमबीबीएस पदवी असलेले अनेक डॉक्‍टर शासकीय सेवेऐवजी आपला स्‍वत:चा दवाखाना थाटण्‍याला पसंती देतात. त्‍यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी पदव्युत्तर पदविका व पदवीधारक अधिकाऱ्यांना अनुक्रमे तीन व सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्यासाठी ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यासह त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुलभ करून त्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र निवड मंडळाच्या माध्यमातून नियुक्त्या करण्यात येत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...