आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटनेच्या रक्षणास सर्वोच्च प्राधान्य हवे : कन्हैयाकुमार; मी बुद्धिस्ट’ पुरस्कार प्रदान सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या राज्यघटनेच्या रक्षणाला सर्व समविचारी लोकांनी सध्या प्राधान्य दिले पाहिजे. नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार कधी या राज्यघटनेत बदल करून देशात हिंदू राष्ट्र आणेल याचा काही नेम नाही, असे मत विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी रविवारी व्यक्त केले.  “मी बुद्धिस्ट’ या सामाजिक संघटनेतर्फे कन्हैयाकुमार, प्रख्यात साहित्यिक डॉ. अनिल अवचट व सामाजिक कार्यकर्त्या लता प्रतिभा मधुकर यांना यंदाचा “मी बुद्धिस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कन्हैया म्हणाला, सध्या देशात सर्वच क्षेत्रांत विलक्षण अस्वस्थतेचे वातावरण आहे. कोणत्याही विषयावर एखाद्याने विरोधी मत मांडले तर त्या व्यक्तीवर विशिष्ट विचारसरणीचे लोक सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून झुंडीने तुटून पडतात. त्यामुळे सध्या मोकळेपणाने चर्चा होत नाही. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. पण त्यानिमित्त मोदी सरकारला देशभर कोणतेही कार्यक्रम करण्याची आवश्यकता वाटली नाही.

 

यंदा या दिवशी मोदी यांचा “मन की बात’ हाच एकमेव कार्यक्रम होता,  असे उपरोधिक उद््गारही कन्हैयाकुमारने काढले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, कोणत्याही कार्याला विचारांचे अधिष्ठान नसेल तर त्या कार्याला काही अर्थ राहत नाही. कोणताही विचार हा जागतिकच असतो व त्या मूळ विचाराकडे लक्ष दिले पाहिजे. परिवर्तनवादी व स्थितीवादी यांच्यात शत्रुत्व असते. पण परस्परांविषयी वैचारिक मतभेद व्यक्त करणाऱ्यात हे शत्रुत्व नसते. पण सध्या मतभेद व शत्रुत्व यांचे सारे संदर्भ बदलले आहेत.    या वेळी डॉ. अनिल अवचट, लता प्रतिभा मधुकर यांचीही भाषणे झाली.     

बातम्या आणखी आहेत...