आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micro ATM With Other On Consumers Door, Centrel Governmental Scheme

मायक्रो एटीएमसह बँक आपल्या दारी, केंद्र सरकारची योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ग्रामीण भागातील जनतेला एटीएमची सेवा नसल्याने अडीअडचणीच्या वेळी पैसे काढणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘मायक्रो एटीएम’ देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यानुसार 15 हजार एटीएम रोहयोची कामे सुरू असलेल्या गावांत देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ‘आधार’चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ही चर्चा झाल्याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिका-याने दिली. ग्रामीण भागात बँका आहेत, परंतु अडचणीच्या वेळी पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना दूरवर जावे लागते. बँका बंद असल्यास रोख रक्कम मिळत नाही. यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. सध्या 500 मायक्रो एटीएम राज्यात असून आणखी 15 हजार मशीन ग्रामीण भागात देण्यात येतील. प्रत्येक बँकेला असे एटीएम देण्यात येणार आहे. एका मशीनची किंमत 20 ते 25 हजार रुपये आहे.


आगळावेगळा प्रयोग
नवे एटीएम मशीन शहरातील एटीएमपेक्षा वेगळे आहे. बँकेचा कर्मचारी एटीएम मशीन घेऊन ग्राहकाच्या घरी जाईल. त्या मशीनमध्ये ग्राहकाने कार्ड स्वाईप करून रकमेचा आकडा टाकायचा. त्यानंतर कर्मचारी ग्राहकाला संबंधित रक्कम देईल आणि त्याची नोंद बँकेत करेल. बँकेमध्ये यासाठी एक दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात येणार असून त्यावर संपर्क साधल्यास एटीएम मशीन ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.