आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील शहरी समस्या सोडविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल- सत्या नडेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी आज सकाळी मुंबईत ‘Future Unleashed’ कार्यक्रमात सहभाग घेतला. - Divya Marathi
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी आज सकाळी मुंबईत ‘Future Unleashed’ कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुंबई- मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आज मुंबई दौ-यावर आहेत. आज सकाळी नडेला यांनी मुंबईत ‘Future Unleashed’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक नामवंत पाहुणे सहभागी झाले होते.

नडेला यांनी येथे आपल्या कंपनीच्या भविष्यातील उद्दिष्ठांबाबत (फ्यूचर प्लॅन्स) माहिती दिली. नडेला यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतातील स्टार्टअप्स कंपनीबाबत असे काही प्रोग्रॅम बनवत आहे जे सिंगल प्लॅटफॉर्म द्वारे शहरी भागातील वाढत्या समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवल्या जातील. नडेला यांनी सांगितले की, हा प्रोजेक्ट पीएम मोदी यांच्या स्मार्ट सिटीजच्या व्हिजनशी निगडीत आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात कम्प्यूटिंग ला मोठे भविष्य असल्याचे नडेलांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात स्मार्ट व्हिलेज व्हिजन राबविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचार करीत आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या ‘Future Unleashed’ कार्यक्रमात कोण काय काय म्हणाले....
- नडेला म्हणाले की, आम्ही फोनवरून फुल्ल डेस्कटॉप (पीसी)चा अनुभव देण्याच्या दिशेने काम करीत आहोत. windows continuum ला भारतासारख्या बाजारपेठेत मोठे भविष्य आहे.
- सत्या नडेला यांनी आपल्या आयफोनवरून मायक्रोसॉफ्टच्या टूल्सचा डेमो दाखवला. नडेलांनी हे ही स्पष्ट केले की, मायक्रोसॉफ्टचा Lumia 950XL फोन येत्या काही महिन्यातच भारतात उपलब्ध करून दिला जाईल.
- येत्या 10 वर्षाच्या काळात आपल्या जीवनशैलीत संगणक व मोबाईलचे महत्त्व व वापर मोठ्या प्रमाणात वाढेल. प्रत्येक ठिकाणी कम्प्यूटिंग असेल. कम्प्यूटिंग हेच भविष्य आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकार इंडस्ट्रियल एरियाला स्मार्ट बनवू पाहत आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल यावर भर देणार आहोत.
- देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी बनविण्याची आमची क्षमता वाढवायची आहे. आम्ही स्मार्ट व्हिलेज (सुंदर गावे) बनवू पाहत आहे.
- ऑनलाईन देण्याबाबत आम्ही महाराष्ट्र रोल मॉडेल ठरावा या दिशेने काम करणार आहोत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले की, महात्मा गांधींचे स्वप्न साकार करायचे असेल तर ग्रामीण भाग व स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूत करावे लागेल. यातच आपले हित आहे.
- मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रमुख भास्कर प्रमाणिक म्हणाले की, मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात 25 वर्ष पूर्ण करीत असल्याने आनंदोत्सव साजरा करीत आहे. याचाच भाग म्हणून 'Future Unleashed' कार्यक्रम सादर केला जात आहे. या मागचा मुख्य उद्देश कल्पना (आयडियाज) आणि त्याच्याशी संबंधित बाबींवर चर्चा करणे हाच आहे.
पुढे आणखी पाहा, या संदर्भातील घडामोडी...