आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर गायक मिका सिंगला अटक व सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर बुधवारी अटक करण्‍यात आली. निश्चित मर्यादेपेक्षा जास्‍तीचे परकीय चलन त्‍याच्‍याजवळ सापडल्‍यामुळे त्‍याला अटक करण्‍यात आली. दंडाची रक्‍कम भरल्‍यानंतर त्‍याला जामीन देण्‍यात आला आहे.

संध्‍याकाळी 7.30 वाजता बँकॉकवरून मुंबईला परतलेल्‍या मिकाची कस्‍टम अधिका-यांनी केलेल्‍या तपासणीत तीन लाखांपेक्षा जास्‍त रोख रक्‍कम आणि 12 हजार डॉलर (सुमारे सहा लाख रूपये) आढळून आले. ती सर्व रक्‍कम जप्‍त करण्‍यात आली आहे.

मिका (वय 35) वर कस्‍टम कायद्यातंर्गत गुन्‍हा दाखल केला आहे. कस्‍टम कायद्यातंर्गत कोणत्‍याही भारतीयाला रोख साडेसात हजार आणि पाच हजार डॉलरपेक्षा जास्‍त रक्‍कम घेऊन जाताना कस्‍टम अधिका-याला सांगावे लागते. हे पैसे बँकॉकमधील शोचे असल्‍याचे मिकाने चौकशीत सांगितले. परंतु, मिकाने दिलेल्‍या उत्तराने समाधानी न झालेल्‍या अधिका-यांनी त्‍याला कस्‍टम कायद्यातंर्गत अटक केली. जामिनासाठी आवश्‍यक असलेली रक्‍कम भरल्‍यानंतर त्‍याला सोडण्‍यात आले.