आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- कॉंग्रेसचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनी 'आदर्श' सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी आणखी एक बॉम्ब टाकला आहे. 'आदर्श'प्रकरणात सर्वच पक्षांचे नेते अडकलेले असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे देवरा यांनी म्हटले आहे. देवरा यांच्या वक्तव्यानंतर आता काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आदर्शप्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे.
खासदार मिलिंद देवरा हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे मानले जातात. त्यांनी यापूर्वी 'आदर्श'बाबत प्रतिक्रीया दिल्यानंतर राहुल गांधी यांनी तत्काळ कडक भूमिका घेतली होती. आता देवरा यांनी सांगितले, की आदर्शच्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. याप्रकरणात सर्व पक्षांचे नेते गुंतले आहेत. आदर्शच्या अहवालावर विधानसभेतही चर्चा व्हायला हवी, असे देवरा म्हणाले. प्रसारमाध्यमांमधून या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे. तसेच विरोधकांनीही यासाठी सहकार्य केले पाहिजे, असेही देवरा म्हणाले.
देवरा यांच्या क्रियेवर राहुल गांधींची प्रतिक्रीया... वाचा पुढे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.