आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM MP Asaduddin Owaisi Slams Salman Khan & Narayan Rane

खासदार ओवेसींनी सलमानला म्हटले \'बेवडा साहब\', राणेंची तुलना केली माकडासोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीम (एमआयएम)चे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बॉलिवूड स्टार सलमान खान यांच्यावर निशाना साधताना त्याला ‘बेवडा साहब’ (जास्त दारू पिणारा) म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंवर टीका करताना त्यांना माकडाची उपमा दिली आहे. नारायण राणे माकडासारख्या उड्या मारून या पक्षातून त्या पक्षातून जात असल्याचे सांगत लक्ष्य केले. महाराष्ट्रात गोमांस बंदी घातली आहे पण त्याऐवजी दारूबंदी केली असती तर मुंबईत गाड्याखाली सापडून लोकांचे मृत्यू तर टाळता आले असते सांगत सलमानला हिट अँड रन प्रकरणावर लक्ष्य केले.
खासदार ओवेसी यांनी रविवारी सायंकाळी मुंबईतील वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ओवेसी यांनी सर्वच प्रस्तापित पक्षांवर व नेत्यांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असणा-या अभिनेता सलमान खानच्या सध्या सुरु असलेल्या हिट अँड रन प्रकरणावरून त्याला जोरदार लक्ष्य केले. सलमान खान हा एक बेजबाबदार व्यक्ती आणि बेवडा साहब असल्याचे सांगत टीका केली. ओवेसी यांनी जानेवारी 2014 मध्येही सलमान खानला लक्ष्य केले होते. त्यावेळी ओवेसी यांनी सलमान खानचा 'जय हो' हा सिनेमा न पाहण्याचे आवाहन केले होते.
जानेवारी 2014 मध्ये सलमान खानने भाजपचे तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यादिवशी मकर संक्रातीनिमित्ताने सलमानने मोदींसमवेत पतंग उडवला होता तसेच मोदींची जोरदार स्तुती केली होती. ओवेसींच्या आवाहनानंतर सलमान खानने जोरदार व बिनधास्त वक्तव्य केले होते. जो व्यक्ती चांगले काम करतो त्याचे गुणगाण करणे गुन्हा ठरत नाही. ओवेसींसारख्या लोकांकडे लक्ष न देणेच योग्य असते असे सलमानने ओवेसींना सुनावले होते. तेव्हापासून ओवेसी सलमानवर नाराज आहेत. सलमानने गुजरातमध्ये जाऊ मोदींच्या मांडीला मांडी लावून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत असे सांगत 'जय हो' वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हापासून सलमान-ओवेसींत खुन्नस सुरु आहे.
पुढे वाचा, नारायण राणेंनाही केले लक्ष्य...