आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर ‘एमआयएम’वरही बंदी घालावी लागेल- एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -‘बेकायदा कृत्ये केल्याचे ठोस पुरावे व ते कोर्टात सिद्ध करता येणे शक्य असल्याशिवाय सरकार कोणत्याही संघटनेवर बंदी घालू शकत नाही, अन्यथा ‘एमआयएम’ पक्षावरही बंदी घातली असती,’ असे वक्तव्य महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी केले.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सहभागाच्या संशयावरून सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात सनातन संस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप होत असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खडसे म्हणाले, ‘एमआयएम पक्षासह अनेक संघटना चिथावणीखोर भाषा करत असतात. मात्र, त्यांनी कोणतेही बेकायदा कृत्य केल्याचे कोर्टात सिद्ध करण्याइतपत पुरावे असल्याशिवाय सरकार या संघटनांवर बंदी घालू शकत नाही. जर असे नसते तर एमआयएमवरही बंदी घालावी लागली असती,’ असे सांगत खडसेंनी एमअायएम पक्षाची तुलना चक्क सनातन संघटनेशी केली.

खडसे ‘सनातन’कडून संमोहित
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी खडसेंच्या विधानाचा समाचार घेतला. ‘भारत हिंदू राष्ट्र करण्याच्या सनातन संस्थेच्या स्वप्नाने खडसेंना संमोहित केले आहे. एमआयएम हा संविधान मानणारा पक्ष आहे. खडसेंसारखे असतील तर पानसरेंचे मारेकरी शोधणे अशक्यचे,’ असे ओवेसी म्हणाले.