आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमअायएम पक्षाचा ‘याेगा’ला विराेध, सूर्यासमाेर झुकणे इस्लामविराेधी ओवेसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने २१ जून राेजी राज्यातील सर्व शाळांमध्ये आणि तुरुंगामध्ये योगाचे धडे दिले जाणार आहेत, परंतु ‘योग हे मुस्लिम धर्माच्या विरोधात अाहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यानिमित्ताने हिंदू राष्ट्राचा अजेंडा राबवत अाहे,’ असा अाराेप करत एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी या कार्यक्रमांना विराेध केला अाहे. ‘एमअायएम’चे प्रमुख खासदार असद्दुद्दीन अाेवेसी यांनीही वृत्तसंस्थेशी बाेलताना याच भूमिकेचा पुनरूच्चार केला अाहे. त्यापाठाेपाठ काही मुस्लिम संघटनांनीही ‘एमअायएम’च्या सुरात सूर मिसळवला अाहे. सरकार मात्र अापल्या भूमिकेवर ठाम अाहे.

‘एमआयएम’चे आमदार वारीस पठाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, ‘योगामध्ये सूर्यनमस्कार करावा लागतो आणि मुस्लिम समुदाय अल्लाव्यतिरिक्त कोणापुढेही झुकत नाही. सूर्यापुढे झुकण्यास सांगणे हे मुस्लिम धर्माच्या विराेधात आहे. योग, संस्कृत आणि गीता पठण करण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणे हे घटनेच्या विराेधात अाहे. एका मुस्लिम मुलीने गीता पठणात पुरस्कार प्राप्त केला त्याला मुस्लिम संघटनेने विरोध केला नाही. त्यामुळे अाता मुस्लिम समुदायावर योगा करण्याची सक्ती करणे योग्य नाही. संघ आणि भाजपचा हिंदू राष्ट्राचा छुपा अजेंडा यातून जनतेसमोर येत अाहे,’ असा अाराेपही पठाण यांनी केला.

शाळांवर सक्ती नाहीच
योग दिवस साजरा करताना कोणाच्याही श्रध्दा व भावनेला ठेच पोहचविण्याचा हेतू नाही. योगामध्ये सूर्य नमस्कार व्यतिरिक्तही अनेक आसने आहेत. राजकीय हेतूने या कार्यक्रमाला विराेध करणे दुर्दैवी वी अाहे. सुटीच्या दिवशी कोणत्याही शाळांवर याेग दिन साजरा करण्याची सक्ती केलेली नाही. त्यामुळे ज्या शाळा हा दिन साजरा करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही.
विनाेद तावडे, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

विराेध चुकीचाच
योगा केल्यामुळे मनाला शांती मिळते, शरीर सुदृढ होते. त्यामुळे प्रत्येकाने तो करणे आवश्यक आहे. योग हा काही कुठल्या धर्माशी जाेडलेला गेला नसल्याने याला काेणीही विरोध करणे हे चुकीचे आहे.
राम शिंदे, गृह राज्यमंत्री