आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात 5 लाख रुपये घेऊनही एमअायएमने तिकीट नाकारले; शेख यांचा अाराेप, आत्मदहनाचा इशारा (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हैदराबाद येथील  एमआयएमचे आमदार कौसर मोहिद्दीन तसेच शाहीन यांनी आपणास ठाणे महापालिकेच्या  निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी २५ लाखांची मागणी केली होती, मात्र तेवढे पैसे देण्याची आपली आर्थिक क्षमता नसल्याने आपण ५ लाख दिले. पण पैसे देऊनही त्यांनी दुसऱ्यालाच  उमेदवारी  दिली, असा आरोप ठाणे मुंब्रा येथील ताजुद्दीन शेख यांनी केला आहे.  
 
हा आरोप करतानाच ताजुद्दीन यांनी ठाणे शहर पाेलिस आयुक्तांना सोमवारी एक निवेदनही दिले आहे. यात एमआयएमच्या  दोन्ही आमदारांनी आपणास पैसे परत न केल्यास ओवेसी बंधूंच्या  मुंब्रा येथील सभेत आपण आत्महत्या  करू अाणि एमआयएममध्ये   कशी फसवणूक होत आहे, हे जनतेसमोर आणले जाईल, असे निवेदनात ताजुद्दीन यांनी  स्पष्ट केले आहे.  
  
एमआयएमचे  आमदार कौसर तसेच शाहीन हे ठाणे महानगरपालिकेचे उमेदवार ठरवण्यासाठी आले होते. २ फेब्रुवारीला या दोघांनीही ताजुद्दीन यांना राॅयल क्लासिक हाॅटेल, शीळफाटा येथे बोलावून  एमआयएमची  उमेदवारी देण्यासाठी २५ लाखांची मागणी केली. २५ लाख देणार असाल तरच तुम्हाला उमेदवारी देऊ; अन्यथा आम्ही दुसऱ्यालाच उमेदवारी देऊ, असे सांगितले. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला अाणि  मी माझ्या मित्रांकडून ५ लाख घेऊन दोन्ही आमदारांकडे पैसे दिले. मात्र बाकीचे  २० लाख देता न आल्याने त्यांनी माझे तिकीट दुसऱ्याच उमदेवाराला दिलेे, असे पाेलिसांना दिलेल्या निवेदनात ताजुद्दीन यांनी नमूद केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...