आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Denies Permission To Do Public Rally Of Mim Party Leader Owaisi

\'MIM\' नेते ओवेसीच्या मुंबईतील आजच्या जाहीर सभेला परवानगी नाकारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जाहीर सभा घेऊ नये आणि घ्यायची असल्यास बंदिस्त सभागृहात घ्यावी असे मुंबई पोलिसांनी ओवसींना बजावले. नागपाडा जंक्शन येथे आज सायंकाळी 7 वाजता अकबरउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा ‘एमआयएम’च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
जाहीर सभेत ओवेसी यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. यामुळे या जाहीर सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले. आता बंद दाराआड मोजक्या समुदायासमोर ओवेसींचे भाषण होईल. मागील आठवड्यात पुण्यात मुस्लिम आरक्षण परिषदेत खासदार असाऊद्दीन ओवेसींचे जाहीर सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर बंद सभागृहात ही सभा झाली होती.
दरम्यान, ओवेसींच्या जाहीर सभेला परवानगी मिळावी यासाठी एमआयएमच्या आमदारांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तांशी यासंदर्भात बोलेन, असे आश्वासन या आमदारांना दिले.