आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mimbai: 60 Per Cent Of Vulnerable Crowded Places

मुंबईतील गर्दीची ६० टक्के ठिकाणे अजूनही आहेत असुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील जवळपास ६० टक्के ठिकाणे अजूनही असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २६/११च्या अतिरेकी हल्ल्यानंतर दरवर्षी मुंबईतील पोलिसांच्या वतीने दरवर्षी सुरक्षा आाढाव्यासाठी पाहणी करण्यात येते. या पाहणी अहवालातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

सुरक्षेच्या आढाव्यासाठी मुंबईतील धार्मिक स्थळे, न्यायालये, पंचतारांकित हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मोठ्या बाजारपेठा, सार्वजनिक उत्सव मंडळे, चौपाट्या आणि परदेशी दूतावास अशा सर्व ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेतला होता. यात अनेक ठिकाणी सुरक्षा भिंतीची उंची कमी आढळली, अनेक ठिकाणची स्कॅनर किंवा मेटल डिटेक्टर्ससारखी तपासणी यंत्रे नीट काम करत नसल्याचे आढळले. काही ठिकाणी सुरक्षा रक्षक सतर्क नसल्याचे आढळून आले आहे. मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी म्हणाले, ज्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीजवर आहे, त्या एजन्सीजच्या मालकांना आपला परवाना रद्द का करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच अशा आस्थापनांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन दर महिन्याला सुरक्षेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचेही कुलकर्णी म्हणाले.