आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाज सुरू असताना मंत्री गप्पांमध्ये मश्गुल; चूक कबूल करून मागितली माफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेचे कामकाज सुरू असताना गप्पांमध्ये तल्लीन मंत्र्यांनी ही कृती चुकीची असल्याची कबुली देत आज सभागृहाची माफी मागितली.
आमदार सुनील केदार यांनी साध्या वेशातील पोलिस विधान भवनाच्या परिसरात फिरत आमदार काय बोलतात, याकडे लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. अशी परवानगी आपण अथवा सरकारने दिली आहे काय, असा प्रश्न त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना विचारला. त्या वेळी सभागृहात अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर गप्पांमध्ये मश्गुल होते. या बाबीकडे लक्ष वेधत त्यांना समज देण्याची मागणी गिरीश बापट यांनी केली.
सदस्यांनी कामकाजात गांभीर्याने सहभागी व्हावे. गप्पा मारायच्याच असतील, तर दुसर्‍या जागा आहेत. आपल्याकडून असे पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन देण्याबाबत वळसे पाटील यांनी मंत्र्यांना बजावले. त्यावर देशमुख यांनी चूक कबूल करत सभागृहाची माफी मागितली.