आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Chandrakant Patil Statement On Toll In Vidhansabha

चारचाकी चालकांनो, सुसाट दामटा गाडी; आता टोल नाही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – राज्‍यात बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर बांधण्यात आलेल्या रस्त्यावर आता यापुढे लहान वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात दिली.
पाटील म्‍हणाले, ‘‘ राज्‍यातील रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍यासाठी चार हजार कोटी रुपये खर्च करून कामे केली जाणार आहेत. त्यामुळे बीओटी प्रोजेक्टअंर्तगत येणा-या रस्त्यावर यापुढे लहान वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. रस्त्यांच्या देखभालीसंदर्भात जे अधिकारी चांगले कामगिरी करतील त्यांना पुरस्कार दिला जाईल’’, असेही पाटील यांनी सांगितले.