आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Eknath Khadse Says English And Science Is Complsery In Madrse

मदरशांमध्ये इंग्रजी, विज्ञान शिकवणे बंधनकारक : खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धर्मभाषेच्या नावावर संस्था स्थापन करून अल्पसंख्याक दर्जा घेतलेल्या शिक्षण संस्थांनी प्रवेशाचा व्यावसायिक वापर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा संस्थांमध्ये ५१ टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशारा अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिला. मुंबईतील अशा १० संस्था बंद केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. मदरसा आधुनिकीकरणासाठी सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी या मदरशांनी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सोशल सायन्स हे विषय शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मदतशात तीन शिक्षक देण्यात येणार असून त्यांचा पगार सरकारच देणार आहे. राज्यातील १८८९ पैकी ५३७ मदरशांनी अशा मदतीसाठी अर्ज केल्याचेही खडसेे म्हणाले.

राज्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन अशा समुदायातील लोकांसह हिंदी, गुजराती, कन्नड अशा भाषांसाठी अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्था जवळजवळ २५०० आहेत. या संस्थांच्या दहा हजारच्या वर शाखा आहेत. या शाळांना सरकारकडून अनेक सवलती प्राप्त होतात. मात्र, या संस्था नियमानुसार ५१ टक्के जागा भरता पैसे घेऊन प्रवेश देत असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी संस्थांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात. नियमबाह्य काम करणाऱ्या अशा संस्थांवर कारवाई करण्याचा सुधारित अध्यादेश जारी करण्यात आल्याचेही खडसे यांनी सांगितले.