आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाला २० रुपये दर न देणाऱ्या संस्थांवर कारवाई, खडसेंनी खडसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दूध उत्पादकांकडून घेण्यात येणाऱ्या दूधाला प्रतिलिटर किमान २० रुपये दर देण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ज्या संस्था या अादेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर बरखास्तीपर्यंतची कारवाई केली जाईल. अशा संस्थांना बुधवारपासून नाेटिसा देण्यात येणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली. दूध भेसळ रोखण्यासाठी १८००२३३४०००० हा एक टोल फ्री क्रमांक तयार करण्यात आला असून धाडसत्राची व्याप्ती वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी दूध दराबाबत एकनाथ खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. दुधामध्ये होणारी भेसळ थांबवण्यात यावी, खासगी तसेच मल्टिस्टेट दुग्ध शाळांचे दूध शासनाने खरीद करावे आणि दुधाचा दर प्रति लिटर २० रुपये देण्यात यावा अशी मागणी या वेळी खोत यांनी केली. बैठकीनंतर खडसे यांनी सांगितले, दुधातील भेसळ रोखण्यासाठी वजने मापे, अन्न व औषध प्रशासन, दुग्धव्यवसाय किंवा पोलिस यांचा एक अधिकारी तैनात करण्यात आला आहे. दूध भेसळीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला अाहे. या क्रमांकावर तक्रार आल्यास हे अधिकारी तक्रारीची तत्काळ दखळ घेऊन कारवाई करतील.