आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटशिवाय गाडी चालविणा-या महिला कॉन्स्टेबलला परिवहनमंत्र्यांकडून दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरा’ असा संदेश देत विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणार्‍यांवर धडक कारवाई करणार्‍या पोलिसांना सोमवारी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चांगलाच धडा शिकवला. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणा-या एका महिला कॉन्स्टेबलला पकडून त्यांच्याकडून दिवाकर रावते यांनी दंड वसूल केला.
मरीन ड्राईव्ह येथून जात असताना दिवाकर रावते यांना दोन महिला कॉन्स्टेबल मोटारसायकलवरून गस्त घालताना दिसल्या. परंतु मोटारसायकल चालविणा-या महिला कॉन्स्टेबलने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे रावते यांनी त्या कॉन्स्टेबलला थांबवले. आपणच नियमांचे पालन केले नाही तर नागरिक आपले कसे ऐकतील, तेव्हा आपण प्रथम नियमांचे पालन करून इतरांसमोर आदर्श ठेवला पाहिजे अशी दिवाकर रावते यांनी दोन्ही महिला कॉन्स्टेबलना समज दिली. त्यानंतर हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवीत असल्यामुळे त्यांच्याकडून दंडदेखील वसूल केला.
बातम्या आणखी आहेत...