आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुला महिलांची नावे देण्याचं प्रकरण: गिरीश महाजनांकडून समस्त महिलांची माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरीश महाजन - Divya Marathi
गिरीश महाजन
मुंबई- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी नंदुरबार येथे दारू व तंबाखूजन्य पदार्थांना महिलांची देण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर महिलांनी टीकेची झोड उठवल्यानंतर सपशेल नांगी टाकली आहे. माझा महिलांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. तो एक विनोदी अंगाने केलेले हलके-फुलके भाष्य होते. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी समस्त महिलांची माफी मागतो, असा माफीनामा दिला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत महाजन यांचे वक्तव्य पुरुषी मानसिकतेचे व महिलांचा अनादर करणार असल्याचे टि्वट केले होते तर, अंजली दमानिया यांनी महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
 
गिरीश महाजन यांना रविवारी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती देताना त्यांनी आमच्या कारखान्याकडे डिस्टिलरी प्रकल्प आहे, मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले होते. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पाटील यांना सल्ला देताना तुम्ही दारूच्या ब्रॅंडला महिलेचे नाव देऊन बघा मग कशी विक्री वाढते ते समजेल असे वक्तव्य केले होते. 
 
काय म्हणाले होते मंत्री गिरीश महाजन-
 
- राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांनी त्यांच्याकडील दारूचे नाव 'भिंगरी' ठेवले आहे. 
- तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव 'ज्युली' आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले त्यांची विक्री अधिक होते. 
- मद्य तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. 
- त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी 'महाराजा' ऐवजी 'महाराणी'असे नाव द्यावे, असा सल्ला मंत्री महाजन यांनी दिला होता.
 
महाजनांच्या विरोधात महिलांचा राज्यभर एल्गार- 
 
- गिरीश महाजन यांनी दारू व तंबाखूपदार्थांना महिलांची नावे द्यावी असे वक्तव्य करताच राज्यातील महिला आक्रमक झाल्या.
- गिरीश महाजन यांनी जाहीर कार्यक्रमात महिलांची माफी मागावी, अन्यथा त्यांना जळगाव जिल्ह्यात प्रवेश घेऊ देणार नसल्याचा इशारा जळगाव महिला राष्ट्रवादीने दिला.
- महिलांचा जाहीररीत्या अवमान केल्यामुळे मंत्री महाजन यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांनी केली. 
- दारूची विक्री वाढवण्यासाठी सत्ताधारी भाजपने दारूच्या बाटल्यांना गिरीश, देवेंद्र, नरेंद्र अशी नावे द्यावी, असा सल्ला माजी महानगर अध्यक्षा मीनल पाटील यांनी दिला. 
- तर भाजपची विचारसणी अखेर समाेर अाली असून त्यांनी महिलांचा अवमान केला असल्याचा उल्लेख माजी महानगर अध्यक्षा प्रतीक्षा शिरसाठ यांनी केला. 
-राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात जोडो मारा आंदोलन केले. राष्ट्रवादीने महाजन यांच्याविरोधात आघाडी उघडली होती.
- विरोधकांच्या हातात आणखी एक आयते कोलित नको, प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात येताच महाजन यांनी माफी मागून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...