आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जितेंद्र आव्हाडांच्या \'संघर्ष\'ची दहीहंडी यंदाही जोरात, 25 लाखांचे बक्षिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने दहीहंडीचे आज सकाळी 9 वाजल्यापासून आयोजन केले आहे)
मुंबई- मुंबई व ठाणे शहरात सर्वात जबरदस्त दहीहंडी कोणाची?अशी अघोषित स्पर्धा मागील काही वर्षापासून सुरु आहे. मात्र, यंदा सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधामुळे या जीवघेण्या स्पर्धेला चाप लावला आहे. तरीही जी काही मोजक्या आयोजकांनी यंदाच्या उत्सवात काहीही कसर राहणार नाही याची दक्षता घेत आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे मंत्री व ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी यंदा दहावा थराला 25 लाखांचे बक्षिस ठेवले आहे. नऊ थर लावणा-यांना 15 लाख, आठ थर लावणा-या पथकाला 1 लाख रूपये तर, सात थर लावणा-या गोविंदा पथकाला 25 हजार रूपये अशी भरघोस बक्षिसे ठेवली आहेत.
आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने महिला दहीहंडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला पथकांना स्वतंत्र बक्षिसे ठेवली आहेत. सात थर लावणा-या महिला पथकांना 1 लाख रूपये तर सहा थर लावणा-यांना 25 हजार रूपये असे बक्षिस दिले जाणार आहे.
दरवर्षी आव्हाडांच्या व सरनाईक यांच्यात दहीहंडी उत्सवात जुगलबंदी पाहायला मिळायची. मात्र यंदा सरनाईक यांनी मागील काही दिवसात घडलेल्या घटना पाहता मेगा इव्हेंट पद्धतीने साजरी होणारा दहीहंडी उत्सव बंद करीत पारंपारिक व साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी शाब्दिक ठिगणी पेटवल्याने मैदानाबाहेर जुगलबंदी रंगू लागली आहे.
दहीहांडीबाबत कोर्टाने बंदी घातल्यावर मीच लढाई लढलो व जिंकलो. तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते मैदान सोडून पळून गेले, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला व पर्यायाने सरनाईक यांनी लगावल्यावर या दोघांत राजकीय जुगलबंदी रंगू लागली आहे.

सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या अटींनुसार दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करणार आहे. गोंविंदा पथकात असलेल्या गोविंदांचा विमा काढलेला असून योग्य ती खबरदारी घेतली जाईल. माझ्या प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या आजपर्यंतच्या दहीहांडीमध्ये अपघात झालेला नाही, यापुढेही तो होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी दहीहांडीच्या उत्सवात गोंविंदाच माझा सेलिब्रिटी असेल, आम्ही इतर कोणीही सेलिब्रिटी बोलवणार नाही, अशी घोषणा केली.
पुढे पाहा, आव्हाडांच्या प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीची छायाचित्रे व लाईव्ह व्हिडिओ...