आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री महादेव जानकरांचा खुलासा : विनंती केली, दबाव टाकला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : नगर परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप असलेले पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला केलेल्या खुलाशात हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मात्र, आपण दबाव टाकला नसून अधिकाऱ्याला केवळ विनंती केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या खुलाशानंतर या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश गडचिरोली जिल्हा अधिकाऱ्यांना आयोगातर्फे देण्यात आले आहेत.
तसेच हे वृत्त सर्वप्रथम दाखवणाऱ्या वृत्तवाहिनीकडेही असंपादित चित्रीकरण (फुटेज) मागवण्यात आले असून ते आयोगाला प्राप्त झाले आहे. जानकर हे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा-देसाईगंज येथील अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचे वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले होते.
बातम्या आणखी आहेत...