मुंबई - ‘भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शी राजकारभारासाठी देशभर चळवळ राबविणारे करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यात जेव्हा दलितांवर अत्याचार होतात तेव्हा कुठे गायब होतात?’ असा खडा सवाल रोहयो आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
अण्णा हजारे यांनी त्यांच्या जिल्हय़ात आजपर्यंत झालेल्या दलित अत्याचारांच्या घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. आपण हस्तक्षेप केल्यास वरिष्ठ जाती आपल्या विरोधात जातील, अशी भीती त्यांना वाटत असावी. त्यामुळे अण्णांचा समाजसेवेचा कळवळा दांभिक आहे, अशी सडेतोड टीका राऊत यांनी केली.
दलितांवर अत्याचार करणार्या गावांच्या ग्रामपंचायती बरखास्त करण्यात याव्यात, त्याचा निधी रोखण्यात यावा, ‘दलित अत्याचार मुक्त गाव’ अभियान राबवण्यात यावे, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना अशा घटनांबाबत जबाबदार धरण्यात यावे, अशा मागण्या आपण पुढील आठवड्यात होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, बीड अत्याचारात पुढे