आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Of Higher And Technical Education Vinod Tawde News In Divya Marathi

आदर्श शिक्षक पुरस्कार रकमेत वाढ; दहा हजारांऐवजी आता मिळणार 25 हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’प्राप्त शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. आतापर्यंत आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना १० हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येत होते. यात १५ हजारांची वाढ केल्याने यापुढे २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

राज्यातील आदर्श शिक्षकांच्या पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून विचाराधीन होता. त्यावर युती सरकारकडून अंतिम निर्णय घेण्यात आला असून यासाठी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. आदर्श शिक्षकांच्या पुरस्कारात वाढ केलेली रोख रक्कम ही २०१३-१४ या वर्षापासून लागू करण्यात आल्याने त्याचा लाभ सहाशेहून अधिक शिक्षकांना होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक व शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले अाहे. ज्या शिक्षकांना दहा हजार रोख रकमेचे पारितोषिक मिळाले आहे, त्यांना उर्वरित फरकाची १५ हजार रुपये रक्कम लवकरच शिक्षण विभागाकडून देण्यात येईल. तसेच ज्या शिक्षकांना ‘आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ विभागून देण्यात आला आहे त्यांना एकूण २० हजारांप्रमाणे प्रतिशिक्षक दहा हजारांची रोख रक्कम मिळणार आहे.