Home »Maharashtra »Mumbai» Minister Pankaja Munde Replys To Dhananjay Munde

धनंजय मुंडे तुम्ही राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती कोटी घेतले?- पंकजा मुंडेंचा पलटवार

दिव्यमराठी वेब टीम | Nov 14, 2017, 20:11 PM IST

बीड- पाच जिल्हा परिषद सदस्यांच्या बदल्यात सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून 15 कोटी रूपये घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय यांच्यावर पलटवार केला आहे. ज्या चुलत्याने ( दिवंगत गोपीनाथ मुंडे) राजकारणात आणलं, अनेक पदे दिली, आमदारकी दिली, सत्ता असती तर मंत्रीही केलं असतं, त्यांच्याशी गद्दारी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी धनंजयराव तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांकडून किती कोटी रूपये घेतले होते असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.
सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते. त्यावेळी अजित पवारांनी व धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच पंकजा मुंडेंकडून धसांनी 15 कोटी रूपये घेतल्याचा गंभीर आरोप धनंजय यांनी केला होता. यानंतर मागील 24 तासात एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी 15 कोटी रूपये घेतल्याचे केलेले वक्तव्य ऐकून मला काहीच आश्चर्य वाटले नाही. यापूर्वीही धनंजय यांनी असे बालिश आणि हास्यास्पद आरोप माझ्यावरच नव्हे तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर केले आहेत. त्यामुळे कालचे वक्तव्य त्या बालिश पणातूनच आले आहे. धनंजय मुंडे यांनी मुंडेसाहेबांच्या जन्मतारखेबाबत अशीच चुकीची माहिती अजित पवारांना दिली होती. शरद पवारांच्या जाहीर सभेतही मुंडे साहेबांना मीच एक लाख बोगस मतदान करून विजयी केल्याचे सांगितले होते. बोगस मतदान करणे व करवून घेणे हा गुन्हा असतो हे माहित नसण्या इतपत धनजंय अपरिपक्व आहेत हे सिद्ध केले आहे. धनजंय मुडेंना भाजपमध्ये सर्व काही दिले होते तरीही ते राष्ट्रवादीत गेले. मग धसांना पैसे देऊन खरेदी केले म्हणणा-या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत जाताना किती कोटी रूपये घेतले होते असे मला त्यांना विचारायचे आहे, असे पंकजा म्हणाल्या.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, अजित पवारांबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे....

Next Article

Recommended