आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास कदम यांचा टायपिस्ट अटकेत; वाळू ठेकेदाराला मागितली 10 लाख रुपयांची खंडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाळू ठेकेदाराला खंडणी मागितल्याप्रकरणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातील टायपिस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. महेश सावंत असे या टायपिस्टचे नाव आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लक्षात येताच स्वत: रामदास कदम यांनीच आपल्या कार्यालयातील या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

सावंत याने एका वाळू ठेकेदाराला दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुखांनी कदम यांना दिली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याचे फोन टॅप करून कदम यांनी याविषयी माहिती मिळवली. मलबार हिल पोलिसांना बोलावून सावंतविरोधात पुरावे देण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...