आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री, सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांवरच नाराज! नेत्यांवर कारवाई हाेत नसल्याचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात युतीचे सरकार येऊन आठ महिने उलटले तरी अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकाही भ्रष्ट नेत्यांवर ठाेस कारवाई हाेत नसल्याने सरकारमधील काही मंत्री व ज्येष्ठ आमदारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. अापल्या मंत्र्यांवरील आरोप परतवून लावण्यासाठी विरोधकांमधील भ्रष्टांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही या नेत्यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांना भेटून केली.

सिंचन, ऊर्जा, बांधकाम, सामाजिक न्याय, नगरविकास विभागात आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींचे भ्रष्टाचार झाले. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून तेव्हा भाजप - शिवसेना नेत्यांनी रान उठवले होते. मात्र भुजबळांचा अपवाद वगळता तटकरे, अजित पवारांच्या चौकशीला वेग आलेला नाही. याउलट पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर तसेच रणजीत पाटील हे युती सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार, बोगस डिग्री, दोन लग्ने अशा एक ना अनेक कारणांमुळे वादात अडकले अाहेत.

पंकजा मुंडे यांच्या महिला बालविकास विभागातील दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप वगळता इतर तीन मंत्र्यांवर थेट भ्रष्टाचाराचे अाराेप नाहीत. पण, गेल्या दोन आठवड्यांतील िवरोधकांचा विधिमंडळातील आवेश हा युती सरकार भ्रष्टाचाराने बरबटेलेले आहे असा आहे. माध्यमांसमोर त्यांनी तसे ठसवण्याचा प्रयत्न चालवला अाहे. हे सारे झाले ते मुख्यमंत्र्यांच्या बोटचेपी धोरणामुळे. त्यांनी सत्तेवर येताच तातडीने भ्रष्ट माजी मंत्र्यांवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती, असे एका कॅबिनेट मंत्र्याने सांगितले. ‘सत्तेवर येण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याच्या घोषणा केल्या होत्या. आता लोक आम्हाला जाब विचारू लागले आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे. हे आता तुम्हीच सांगा. विराेधी पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना अशीच सूट दिली तर विराेधक तर वरचढ हाेतीलच. पण जनतेच्या मनातूनही युतीचे सरकार उतरेल’, अशा शब्दात काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भावना व्यक्त केल्याचे एका मंत्र्याने सांगितले.
पुढे वाचा... कारवाई तर होणारच!