आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांसाठी घरी आलेल्या मुलीवर पित्याने केला बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सातवर्षीय मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना उल्हासनगर येथे उघडकीस आली आहे. तसेच एका तरुणानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. पुण्यातील एका शाळेत शिकत असलेली ही मुलगी काही दिवसांपूर्वी घरी आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वडील अनिल पगारे व विठ्ठल नाटेकर यांना अटक केली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ही मुलगी शिक्षणासाठी पुण्यातील पंडित रमा मिशन येथे राहते. दोन दिवसांपूर्वी घरी कोणी नसताना अनिलने तिच्यावर अत्याचार केले. तसेच शेजारी राहणार्‍या नाटेकरनेही अत्याचार केल्याचे शेजार्‍यांनी सांगितले आहे.