आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minority Record Now In Tenth Class Examination Form

दहावीच्या परीक्षा अर्जावर आता अल्पसंख्याकांची नोंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दहावीच्या परीक्षा अर्जावर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची नोंद स्वतंत्रपणे केली जाणार असून त्यासाठी खास चौकट ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी सोमवारी दिली.

या निर्णयामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची आकडेवारी पहिल्यांदाच हाती येईल. तसेच दहावीच्या परीक्षेला अल्पसंख्याक समाजातील किती विद्यार्थी बसले आणि किती उत्तीर्ण झाले याची माहिती शासनाला समजेल, असे नसीम खान यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासन अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या अनेक योजना राबवते. त्याचा लाभ घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक असल्याचा पुरावा द्यावा लागतो. या अटीमुळे अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात. हे टाळण्यासाठी परीक्षेच्या अर्जावर नोंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

उर्दूची पदे भरणार
राज्यात उदूरू शिक्षकांची रिक्त आहेत. 2009 मध्ये घेण्यात आलेल्या सीईटीमध्ये उर्दूचे 690 शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना लवकरच कामावर रुजू करून घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली.