आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minority Schemes Benefited To Opposition Parties

अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा फायदा विरोधी पक्षांनाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष करतात. ही बाब अल्पसंख्याकांना ठाऊक असल्याने निवडणुकीत या धोरणाचा फायदा सत्ताधा-यांना नव्हे तर विरोधी पक्षांनाच होईल,’ असा दावा भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय मुस्लिम केंद्र मुंब्रा येथे सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी ‘आगामी निवडणुका आव्हान ठरल्या असून सर्व मुस्लिम समाजाने एकजुटीने यावे,’ असे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर मंत्रिमंडळ बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांच्या मागणीवर सच्चर कमिटीच्या शिफारशींनुसार सरकारी नोक-यांमध्ये अल्पसंख्याकांचा टक्का वाढवण्याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.


याबाबत भाजपच्या एका नेत्याने सांगितले, काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याकांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु आता मुस्लिम तरुण सुशिक्षित झाला असून त्याला हे राजकारण चांगलेच समजू लागले आहे. मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाल्यापासून अल्पसंख्याक समुदाय मोठ्या संख्येने भाजपकडे वळत आहे,’ असा दावाही नेत्याने केला.