आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minsiter Vinod Tavade\'s Father Shridhar Tavade No More

शिक्षणमंत्री विनोद तावडेंना पितृशोक, श्रीधर तावडेंचे मुंबईत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पितृशोक झाला आहे. तावडेंचे वडील श्रीधर तावडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ल्यातील राहत्या घरी श्रीधर तावडेंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी विजया तावडे, मुलगी जया कदम, जावई, मुलगा विलास तावडे व मंत्री विनोद तावडे, सूना-नातवंडे असा परिवार आहे.
आज सायंकाळी त्यांच्यावर विलेपार्लेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातील मातोश्री या निवासस्थानी श्रीधर तावडे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यात आले.
श्रीधर तावडे नोकरीनिमित्त आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे लालबाग येथील तेजुकाया मॅन्शनच्या छोट्या खोलीत गेले. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले. वडीलांच्या प्रेरणेतूनच विनोद तावडे यांनी राजकारणात प्रवेश केला.