आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा-भाईंदरसाठी 20 ऑगस्टला मतदान; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागांसाठीही व्होटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मीरा-भाईंदर महापालिकेसाठी येत्या 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होईल, तर 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही सहारिया यांनी केली.
 
मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत अर्ज दाखल करता येतील. तर 3 ऑगस्ट 2017 रोजी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्ह दिले जाईल.
20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
 
जि.प. आणि पं.स.च्या रिक्त पदांसाठीही मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग, तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल, असेही जे. एस. सहारिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...