आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी 47 टक्के मतदान; आज निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी आज मतदान झाले. - Divya Marathi
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी आज मतदान झाले.
मुंबई- मीरा-भाईंदरमहापालिकेसाठी रविवारी ९४ जागांसाठी दिवसअखेर सरासरी ४७ टक्के मतदान झाले. मुंबई परिसरात दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसाचा मतदानाला मोठा फटका बसला. सोमवारी मतमोजणी होत असून भाजप अाणि शिवसेना यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. २४ प्रभागांत ९५ वाॅर्डांतील ५०९ उमेदवार उभे हाेते.
 
भाजपचे अामदार नरेंद्र मेहता एका मतदान केंद्रावर गेले. त्यांच्या उपस्थितीला इतर पक्षांच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होते. नंतर मेहता यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. शिवसेना-भाजपमध्ये येथे खरी लढत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हिंदी भाषिकांची मते निर्णायक असल्याने भाजपचे पारडे जड मानण्यात येत आहे.
 
भाजपला या निवडणूकीत आपला गड वाचवायचा आहे तर शिवसेनेला हा गड जिंकायचा आहे.  या निवडणूकीसाठी 509 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या ठिकाणी काही काळ वर्चस्व निर्माण केले होते. आता मात्र पक्षबदलूंचा सर्वाधिक फटका याच पक्षांना बसला आहे. शिवसेनेनेही येथे हिंदी भाषिकांना उमेदवारी दिली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील प्रचारसभेत हिंदी भाषण केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...