आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ओव्‍हरहेड वायरवर करत होता स्‍टंट, शॉक लागून कोसळला खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येथील मीरा रोड रेल्‍वे स्‍टेशनवर एक युवक ओव्‍हरहेड वायरवर स्‍टंट करत होता. स्‍टेशनवरील इतर प्रवांशानी त्‍याला खाली उतर म्‍हणून विनवण्‍या केल्‍या. मात्र, त्‍याने ऐक‍ले नाही. दरम्‍यान, विजेचा जोरदार झटका बसून तो खाली कोसळला. या घटनेत तो 80 टक्‍के भाजला असून, त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमके काय झाले ?
> स्‍टंट करणारा युवक गतीमंद असल्‍याचे प्रवासी सांगत होते.
> सोमवारी दुपारी तो खांबावरुन थेट रेल्वेच्या पेन्टाग्राफ वायरवर चढला.
> त्‍यामुळे बघ्‍याची गर्दी झाली.
> काही कळायच्‍या आत तो वायरला लटकून कसरती करून दाखवाला लागला.
> ते पाहून रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचा थरकाप उडाला.
> हा थरारक प्रकार काही प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
> कसरती करताना उच्चदाब असलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने त्‍याला विजेचा जोरदार झटका लागला.
> त्‍यामुळे तो खाली कोसळला.
> त्यानंतर बराच वेळ तो तसाच तडफडत होता.
> रेल्‍वे सुरक्षा बलाच्‍या कर्मचाऱ्यांनी त्‍याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

प्रवासी ओरडत होते खाली उतर
गाडी आली खाली उतर असे प्रवासी त्‍याला म्‍हणत होते. मात्र, त्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, व्‍ह‍िडिओचे स्‍क्रीन शॉट आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍ह‍िडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...